Monday, September 5, 2016

बांबवडे येथील जनता विद्यालयातील शिक्षक केतन घाडगे यांचा प्रामाणिकपणा, एटीएम जवळ सापडलेली दिड लाखाची रोकड परत@

बांबवडे येथील जनता विद्यालयातील शिक्षक केतन घाडगे यांचा प्रामाणिकपणा, एटीएम जवळ सापडलेली दिड लाखाची रोकड परत@
पलुस/प्रतिनिधी
बांबवडे (ता.पलुस) .येथील जनता विद्यालय बांबवडे चे संगणक शिक्षक श्री केतन घाडगे(रा.विठ्ठलवाडी) यांना पलूस येथिल बॕक आॕफ इंडिया ATM जवळ दीडलाख रुपये सापडलेले केले परत.
पलुस मधील श्री बी. व्हि.कुंभार हे ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आले त्यांनी पैसे काढले पण त्यांच्या घाईत त्यांनी काढलेले पैसे ATM मध्येच विसरून ते निघुन गेले त्यावेळी जनता विद्यालयाचे शिक्षक श्री केतन घाडगे हे पैसे काढायला गेले असता त्यांना पैशाची बॕग सापडली त्या मध्ये पैसे व त्यांची कागदपत्रे दिसुन आले त्यांनी त्या कागदपञा वरुन ओळख काढुन ती पैशाची बॕग त्यांना परत केली या बद्दल श्री बी. व्हि.कुंभार यांनी खुश होवुन बक्षिस दिले.
असा प्रामाणिक पणा दाखविल्यामुळे जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ दिलशाद मुल्ला व सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने व संस्थेचे सचिव श्री हणमंतराव जाधव ,सहसचिव श्री विश्वास पाटील यांनी त्यांचे आभिनंदन केले.

No comments:

Post a Comment